Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
संघटना प्रतिनिधी :
मिलटरी भरती परीक्षेसाठी मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्ष २०२३-२४ करीता महाज्योती संस्थेच्यामार्फत पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दीतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील दीड हजार विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे आहे. विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
योजनेच्या लाभासाठी पात्रता
प्रशिक्षणा चा कालावधी ६ महिने राहील. पात्र विद्यार्थ्यांची प्रतिमाह हजेरी ७५ टक्के उपस्थिती राहिल्यास, दर महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. सदर योजनेसाठी विद्यार्थ्यी महाराष्ट्रातील मुळ रहिवासी असून मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्पन्न गटात मोडणारा नसावा (नॉन क्रिमिलेअर असावा). विद्यार्थ्यांचे शिक्षण १२ वी वर्गात प्रवेश घेतला असावा किंवा १२ वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा. त्यांचे वय १७ वर्ष ते ४३ वर्षापर्यंत असावे. महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजनेसाठी अर्ज केल्यास स्विकारले जाणार नाही.
अनिवार्य वैद्यकीय मानके
विद्यार्थ्यांची उंची कमीत कमी १५७ सें.मी. पुरूष व १५२ सें.मी. महिला तर छाती कमीत कमी ७७ सें.मी व दिर्घ श्वास घेतल्यावर ८२ सें.मी. असावी. छाती फक्त पुरूषाकरिता आहे. उमेदवारांचे शरीर मजबुत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे. छातीचा विकास कमीत कमी ५ से.मी विस्तारित असावा.
अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावे. प्राप्त अर्जांची निकषानुसार छानणी केली जाईल. छानणीमध्ये प्रात्र अर्जांची चाळणी छाननीमध्ये पात्र विद्यार्थ्यांची मिलिटरी भरती पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार करण्यात येईल. चाळणी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांची गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात यादी व प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुरबीन दृष्टि असणे आवश्यक आहे. त्याला प्रत्येक डोळ्याने ६/६ अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. (सैन्य भरतीसाठी रंग दृष्टी चाचणी CP-III असावी.) नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. (म्हणजे किमान १४ दंत बिंदु) हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅरिकोकल किंवा मुळव्याध यांसारखे रोग नसावेत. लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे. (उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करुनच प्रशिक्षणाकरिता प्रवेश दिल्या जाईल, याची उमेवारांनी नोंद घ्यावी)
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे
| अ. क्रं. | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी | निवडीनुसार विद्यार्थी संख्या |
| १ | इतर मागास वर्ग | ५९ टक्के | ८८५ |
| २ | निरधीसुचीत जमाती – अ | १० टक्के | १५० |
| ३ | भटक्या जमाती – ब | ८ टक्के | १२० |
| ४ | भटक्या जमाती – क | ११ टक्के | १६५ |
| ५ | भटक्या जमाती – ड | ६ टक्के | ९० |
| ६ | विशेश मागास प्रवर्ग | ६ टक्के | ९० |
| एकूण | १०० टक्के | १,५०० |
समांतर आरक्षणात प्रवर्गनिहाय महिलांसाठी ३० टक्के जागा तर अनाथांसाठी १ टक्के आरक्षित आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Application For Military Bharti Training 2023-24 या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. अर्जासोबत खालील प्रमाणे सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.
लागणारे आवश्यक कागदपत्रे –
The OBC Adhikari karmachari Union is a political organization formed in 2018 to promote the interests of central and state government, semi-government, private sector officials within the framework of the Constitution of India..

Post a Comment